Maruti Stotra

Written by on June 7, 2022


  • श्री मारुती स्तोत्र - समूहस्वर
Update Required To play the media you will need to either update your browser to a recent version or update your Flash plugin.

 

 

 

 

श्री मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।१।।

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी दुखःहारी धूर्त वैष्णव गायका ।।२।।

दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना ।।३।।

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ।।४।।

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।

ब्रह्मांडे माईली नेणों, आवळें दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी ताठिल्या बळें ।।६।।

पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।

ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।८।।

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।।

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।

अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें, मेरुमांदार धाकुटें ।।११।।

ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छे करू शके । तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।।

आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।।

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।१४।।

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।१५।।

हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।१६।।

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडणू । रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।।

।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

।। श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ।।

 


Continue reading

Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

Current show

Background