श्रीमद् भागवत कथा सप्ताह

कलायन कल्चरल सेंटर हॉल [पुणे]


Event info
Date: July 28, 2023
Time: 4:00 pm
Location: कलायन कल्चरल सेंटर हॉल
Address: ४७/११, एरंडवणे, नळस्टॉपजवळील अभिनव मराठी शाळेसमोर पुणे
Phone: +917020353130
Details

अधिक मासानिमित्त प्रत्यक्ष सभागृहात श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजित केला आहे. प. पू. आचार्य स्वामी गोविंद देव गिरीजी यांचे शिष्य वेदमूर्ती श्री. शंतनु रिठे महाराज भागवत कथा करणार आहेत. वामन पूजन, श्रीकृष्ण जन्म, गोवर्धन पूजा, कंसमुक्ती, रुक्मिणी स्वयंवर असे विविध सोहळे या कथेच्या दरम्यान साजरे केले जाणार आहेत.

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान दुपारी ४ ते ८ या वेळेत ही भागवत कथा होणार आहे. या दरम्यान रोज सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत श्रीमद् भागवताचे संस्कृत पठण होणार आहे. श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहस्त्र हवनाने होणार आहे, तसेच त्यानंतर संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे संस्कृत पठण होईल व त्यानंतर अखेरीस विष्णू सहस्त्रनामाचे पठण होणार आहे.

Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

Current show

Background