सामुदायिक अग्निहोत्र

कलायन कल्चरल सेंटर हॉल [Pune]


Event info
Date: October 8, 2023
Time: 5:30 pm
Location: कलायन कल्चरल सेंटर हॉल
Address: 47/11, Vinayak Ashram, Erandawane, Pune
Details

अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तर्यामी (अग्नीमध्ये) आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्‍वरी उपासना.

सूर्योदयाच्या, तसेच सूर्यास्ताच्या वेळी केली जाणारी सूर्याची उपासना म्हणजे अग्निहोत्र ! अग्निहोत्र म्हणजे कामधेनूच आहे. अग्निहोत्र करण्यासाठी वेळ सोडली, तर अन्य कशाचेच बंधन नाही. अग्निहोत्रासाठी पिरॅमिडच्या आकाराच्या पात्रात गायीच्या शेणाच्या गोवर्‍या, २ चिमूट अखंड तांदूळ आणि देशी गायीचे तूप यांच्या साहाय्याने प्रज्वलित केल्या जातात. त्यानंतर २ मंत्र म्हणून आहुती दिली जाते.

ही उपासना कशी करावी याचे मोफत प्रशिक्षण भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने अग्निहोत्राच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या विश्व फाऊंडेशन शिवपुरी, अक्कलकोट यांच्या सहयोगाने आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांना साहित्यही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, हे आवाहन.

Play

Bhakti Sudha

Current track

Title

Artist

Current show

भक्तिरंग

1:00 pm 2:00 pm

Current show

भक्तिरंग

1:00 pm 2:00 pm

Background